मालवण बाजरपेठेतील सर्व दुकाने सुरू होणार; सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक

454

राज्य शासनाच्या आदेशानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉडाऊनमध्ये शिथिलता जाहीर करत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. सर्व दुकाने शुक्रवारपासून 9 ते 5 या वेळेते सुरू राहणार आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व खबरदारीच्या सूचना, नियम आणि अटीशर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.

मालवण बाजारपेठ शुक्रवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत खुली होणार आहे. बाजरपेठेतील सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मेडिकल दुकानांना वेळेचे बंधन नाही. मेडिकल दुकाने दिवसभर सुरू राहणार आहेत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत कर्फ्यु कायम राहणार आहे, असे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले.

मालवण पालिका सभागृहात पदाधिकारी व व्यापारी बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, गणेश कुशे, दीपक पाटकर यासह व्यापारी संघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर यासह व्यापारी उपस्थित होते. बाजारपेठ येथील दुकाने सायंकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्यास शिथिलता द्या, अशी मागणी व्यापारी व लोकप्रतिनिधी यांनी केली. मात्र, मुदतवाढ अथवा वेळेत शिथिलता देण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले. तरीही या मागणीबाबत शासनाकडे लेखी मागणी करू, असेही मुख्याधिकारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या