
सामना प्रतिनिधी। मालवण
हडी साईमंदिर येथे एका मोबाईल चोराला पोलिसांनी अटक केली आहे. तुषार वसंत पवार (30) असे त्याचे नाव आहे. या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी आचरा येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडी येथे साईमंदिरचे प्लास्टरचे काम करत असताना टेबलावरील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार संतोष बिडवाडकर यांनी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय आंबेरकर यांच्या पथकाने आचरा येथून तुषार यास ताब्यात घेतले.































































