मालवण येथे अपघातात दोघे जखमी, आचरा-देवगड रस्त्यावर ओम्नी दुचाकीची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आचरा-देवगड रस्त्यावर आचरापार पुलापासून काही अंतरावरील अवघड वळणावर दुचाकी व ओमनी गाडी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण व महिला जखमी झाली. दरम्यान, अपघातातील जखमींना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले आहे.

तुकाराम जोशी (सौंदाळे, देवगड) हे ओमनी गाडीने आचरा दिशेने येत असताना आचारापार पुलापासून काही अंतरावर असलेल्या अवघड वळणावर देवगडच्या दिशेने येणाऱया भुषण श्रीधर घाडी देवगड जामसंडे वय 23 यांच्या दुचाकीची व ओमनिची धडक बसली. यात दुचाकीस्वार भूषण घाडी व त्यांच्यासमवेत असलेल्या स्वरा तुषार डोंगरे वय 29 (देवगड वरेरी) हे दोघेही जखमी झाले. दुचाकीस्वार घाडी यांना डोक्याला, गळ्याला, हाताला दुखापत झाली असून महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघात झाल्यानतंर या मार्गाने येणारे आचरा येथील विनोद गवळी यांनी तत्परता दाखवत जखमी झालेल्यांना आपल्या गाडीने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शामराव जाधव यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले.