मालवण पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; दोन जण कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण शहर व परिसरात गेले काही दिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (4 सप्टेंबर) मालवण ग्रामीण रुग्णालयात 74 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात 8 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, कोरोनाने मालवण पोलीस ठाण्यात शिरकाव केला असून एक अधिकारी व एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची तात्काळ तपासणी करण्यात येत आहे. मालवण शहरात शुक्रवारी 5 कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यात एक पोलीस अधिकारी, एक कर्मचारी यासह भरड, बाजारपेठ मार्गावरील एक सलून व्यवसाईक तसेच धुरीवाडा येथील एका घरातील दोन सदस्य पॉझिटिव्ह सापडले आहेत.

वायरी-भूतनाथ येथे तीन रुग्ण
मालवण शहरालगत असणाऱ्या वायरी-भूतनाथ गावात तीन व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली.