मालवणातील सहा ग्रामपंचायतीं साठी 68 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार 15 जानेवारी सकाळी साडे सात ते साडे पाच या कालावधीत शांततेत मतदान पार पडले. सरासरी 68 टक्के मतदान झाले. अशी माहिती मालवण निवडणूक विभागाने दिली आहे.

सोमवार 18 जानेवारी रोजी मालवण तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर मतदारांची तापमान तपासणी व हात सॅनिटायझर केले जात होते. मास्क व सोशल डिस्टन्स बंधनकारक होते.

मालवण तालुक्यात शिवसेना-विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. मतमोजणीतून अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

68 टक्के मतदान

खरारे-पेंडूर 64.25, गोळवण-कुमामे-डीकवल 41.04, कुण कावळे 68.10, मसदे-चुनवरे 42.02, चिंदर 64.14, आडवली-माडली 41.43 असे मतदान झाले आहे. अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.