
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कासारटाका येथे पर्यटन हंगामात मानवनिर्मित कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र चौक व रुग्ण कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत प्लास्टिकच्या बाटल्या, बीअर बाटल्या पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास असा सुमारे एक ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला.
धार्मिक केंद्र आणि पर्यटनाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामापुर कासारटाका येथे वर्षा पर्यटनानिमित्त अनेक लोक येत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्लास्टिक व अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर साचून पर्यावरणाला हानी पोहोचते. हा कचरा गोळा करुन परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियान मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र चौके, रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
summary…malvan-swachta mohim






























































