
हिंदुस्थानात सध्या भाजप केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून देशात तुघलकी पद्धतीने कारभार हाकत आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. स्टॉफ सिलेक्शन कमिशनच्या नियुक्त्यांमधील अनियमिततेच्या वादानंतर त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे आयोजित बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.



























































