
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात बलात्कार करून ठार झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांना कोलकाता पोलिसांनी पैसे दिल्याचा आरोप फेटाळून लावला. पालकांना कधीही पैसे दिले गेले नाहीत, असं सांगतानाच बॅनर्जी यांनी आपल्या सरकारवर आरोपांचं स्पष्ट शब्दात खंडन केलं.
32 वर्षीय डॉक्टरच्या वडिलांनी गेल्या आठवड्यात आरोप केला की कोलकाता पोलिसांनी प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना शांत राहण्यासाठी पैसे देऊ केले. याचा प्रत्युत्तर देताना ममता म्हणाल्या की, ‘मी मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना कधीही पैसे देऊ केले नाहीत. ‘मी मृत डॉक्टरांच्या पालकांना सांगितलं की जर त्यांना त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ काही करायचे असेल तर आमचे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. कोलकाता पोलीस आयुक्त, विनीत गोयल यांनी आरजी कारच्या निषेधानंतर राजीनामा देण्याची ऑफर दिली, परंतु आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची जाण असलेल्या व्यक्तीची गरज आहे’, असं त्या म्हणाल्या.