West Bengal Election Results मला लाथ मारली, तीन वाजल्यापासून ते आम्हाला मारतायेत; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर दुपारपासून त्या हजर होत्या. तिथून निघताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

”तीन वाजल्यापासून ते आम्हाला मारतायेत. मला मारलं, मला लाथ मारली. सीसीटीव्ही देखील बंद केले. पाच मिनिट माझ्या एजंटला आत जाऊ द्यायची विनंती केली. आधी हो म्हणाले पण नंतर त्यांनी जाऊ दिले नाही. मी याची तक्रार करणार आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.