लोकलमध्ये मणीपूरी विद्यार्थीनीची छेडछाड करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका मणीपूरी विद्यार्थिनीची छेडछाड केल्या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. अय्याज सत्तार कुरेशी (26) असे आरोपीचे नाव असून तो मानखुर्दचा रहिवासी आहे. 11 सप्टेंबर रोजी पीडित विद्यार्थिनी आपल्या युरोपीयन मित्रासोबत लोकलमधून प्रवास करत असताना आरोपीने तीची छेड काढली होती. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईत शिकत असलेल्या मणीपुरी विद्यार्थीनिसोबत आरोपी अय्याजने अश्लील वर्तन करत छेड काढली होती. हार्बर लाईनवरील वाशी आणि गोवंडी स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती . त्यावेळी आरोपीला पकडण्याचा पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत आरोपी पसार झाला होता. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडली तेव्हा पीडित विद्यार्थिनिने आरोपीच्या काढलेल्या फोटोवरून तसेच वेगवेगळ्या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.