शस्त्राचा धाक दाखवून चोऱ्या करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शस्त्राचा धाक दाखवून चोऱया करणाऱयाला अखेर आरे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. पपू हरिश्चंद्र वरटे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पपू हा आरे कॉलनीच्या रॉयल पामजवळ चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर उप निरीक्षक खोलम यांच्या पथकाने मंगळवारी रॉयल पामजवळ सापळा रचून पपूला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पपू हा शस्त्राचा धाक दाखवून चोऱया करतो. त्याच्या विरोधात आरे पोलीस ठाण्यात दोन, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पपूने गावठी रिव्हॉल्व्हर कुठून आणले त्याचा तपास आरे पोलीस करत आहेत.