गोवंडीत पालिका कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या गोवंडी येथील कार्यालयाबाहेर आज एका नागरिकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. देवनार पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्या व्यक्तीला रोखल्याने अनर्थ टळला.

विशाल मोरे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक प्रश्नांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील पालिका अधिकारी या पत्रांकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोरे यांनी मंगळवारी दुपारी पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकारी कुठल्याही पत्राची दखल घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी पालिका कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचे पत्र पालिकेला दिले होते.

Mumbai: Man Attempts Self-Immolation Outside BMC Govandi Office Over Local Issues

A citizen named Vishal More attempted self-immolation outside the BMC M-East ward office in Govandi, alleging official negligence toward local complaints.