मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; कल्याणमध्ये गुन्हा दाखल

शिवसेना पक्षप्रमख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत एका माथेफिरूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली आहे. याचे तीव्र पडसाद कल्याणमध्ये उमटले. शिवसैनिक आक्रमक होताच माथेफिरू पुरुषोत्तम देशमुखविरोधात कल्याणमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण आणि फोटो व्हायरल झाल्याने कल्याणमधील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी यांनी आज कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.