महिलेवर काळी जादू केल्याच्या संशयातून तरुणाला जिवंत जाळले

789
प्रातिनिधिक

एका महिलेवर काळी जादू केल्याच्या संशयातून एका तरुणाची तिच्या नातेवाईकांनी जिवंत जाळून हत्या केली असल्याची माहिती तेलंगणातील अद्रासपाल्ली गावात घडली आहे. बोयीनी अंजानेयुलू (24) असे त्या तरुणाचे नाव आहे.

गारा लक्ष्मी या महिलेचा काही दिवसांपूर्वी आजारापणाने मृत्यू झाला होता. मात्र तिच्यावर बोयीनी याने काळी जादू केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. गारा लक्ष्मी हिच्यावर काळी जादू केल्यानंतर ती आजारी पडली व त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गारा लक्ष्मी हिच्या कुटुंबीयांनी बोयीनी याला बेदम मारहाण केली व गाराच्या जळत्या चितेत त्याला फेकून दिले.

बोयीनी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोधा शोध केली तेव्हा गाराच्या जळत्या चीतेजवळ त्यांना त्याची चप्पल आढळली. त्यानी जळत असलेल्या चितेतून बोयीनीला खेचून बाहेर काढले व त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या