Video: ओव्हरहेड वायरच्या खांबावर माथेफिरू चढला, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

1144

बुधवारी सायंकाळी एक माथेफिरू ठाणे स्टेशनजवळील ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून 20 ते 30 मिनिटांनी उशिराने सुरू आहे. माथेफिरू ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढल्याची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळ घडला. माथेफिरूला खाली उतरवू पर्यंत इलेक्ट्रीक सप्लाय बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकारामुळे रेल्वे काही काळ रुळावर थांबून होत्या.

वाहतूक विस्कळीत झाली असून तब्बल 30 मिनिटाने उशिरा सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.  रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

station

दरम्यान, ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढणाऱ्या माथेफिरूचे नाव मंगल रामपाल यादव (20) असल्याचे समोर आले आहे.  तो ठाणे रेल्वे स्थानक क्रमांक 1 आणि 2 मधील विद्युत खांबावर चढला होता. ठाणे अ. दलाचे फायरमन आर. डी. साबळे, फायरमन एस. वी. खेडेकर आणि फायरमन आर. जे. शेलार यांनी खांबावर चढून सुखरूप खाली उतरवले.

आपली प्रतिक्रिया द्या