आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने कुटुंबासह केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जामनगर

गुजरातच्या जामनगरमध्ये सूर्यमुखी कॉलनीत एका कटुंबाने सामुहिक आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. दीपक सकारिया यांची आई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी कटुंबाचा बराच पैसा खर्च होत होता. दीपककडे आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी नैराश्याने सोमवारी कुटुंबासह आत्महत्या केली. मृतांमध्ये पाच जणांचा समावेश असून त्यात पाच वर्षांचा मुलगाही आहे.

दीपक जामनगरमध्ये भाड्याच्या जागेत किराणाचे दुकान चालवत होते. त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. तसेच त्यांची आई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी दीपकला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत होता. मात्र, दीपकडचे पैसे संपल्याने आता आईचे उपचार कसे करावे अशा विंवचनेत दीपक होते. यामुळे दीपकला नैराश्य आले होते. त्यामुळे सोमवारी रात्री दीपकच्या आईसह पूर्ण कुटुंबाने पाण्यातून कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दीपक सकारिया (45), त्याची पत्नी आरती (42), मुलगी कुमकुम(11), मुलगा हेमंत (5) आणि आई जया पन्नाला (80) अशी मृतांची नावे आहेत.