संभाजीनगरात कोरोनासारख्याच ‘सारी’ आजाराने तरुणाचा मृत्यू

2145
file photo

सारी( सिव्हिअरली अँक्युट रेस्पायरेटरी इलनेस) च्या आजाराने आज मंगळवारी संभाजीनगर मधील खासगी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सारी आणि कोरोनाचे लक्षणे सारखी असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सारी आजार हा सदीँ, ताप खोकला याने होत असून दोन दिवसातच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते. त्यातच त्याचा मृत्यू होतो. अशाच प्रकारची लक्षणे कोरोना व्हायरसमध्ये आढळून येतात.

मंगळवारी एका तरुणाचे सारी आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे शहरातून कोरोना व्हायरस हद्दपार झाला असे म्हणता येणार नाही, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या