
सामना ऑनलाईन। कॅलिफॉर्निया
अॅशलॅंडमधील ओरेगॉनमध्ये राहणाऱ्या एका तरुणांने एका चुकीमुळे चक्क 23 हजार डॉलर्सची ( सुमारे 16 लाख) रक्कम फेकून दिली होती. मात्र, पोलीस, प्रशासन आणि कचरावेचकाच्या सर्तकतेमुळे त्याला ही रक्कम परत मिळाली आहे. या तरुणाने बूटांचा खोका समजून पैशाने भरलेला खोका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला. बूटांचा खोका रिकामा झाल्याने त्याने तो फेकून दिला. त्याने फेकलेला खोका कचऱ्याच्य़ा ढिगाऱ्यात पडला. मात्र, त्या खोक्यात त्याने 23,000 डॉलर्सची रक्कम ठेवली होती. खोका फेकताना ही चूक त्याच्या लक्षात आली नाही.
या तरुणाने आपली संपूर्ण बचत या खोक्यात ठेवली होती. मात्र, खोका रिकामा असल्याचे समजून त्याने रक्कम असलेला खोकाच फेकून दिला. त्याला चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांने अधिकाऱ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्याने खोका फेकलेला कचऱ्याचा ढिगारा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी 200 मैल दूर असणाऱ्या कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्या केंद्रात हलवला होता. या केंद्राला असा खोका सापडल्यास लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. त्यामुळे तेथील कचरावेचक कर्मचारी खोका मिळतो का यावर लक्ष ठेवत होते. शुक्रवारी एका कर्मचाऱ्याला कचऱ्याचे विभाजन करताना तो खोका सापडला. खोका सापडल्यावर तरुणाला बोलावून खोक्याची ओळख पटवून रक्कमेसह तो खोका त्याला परत देण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या तरुणाची बचत केलेली रक्कम त्याला परत मिळाली आहे.






























































