गणपतीपुळ्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह भंडारपुळ्यात सापडला

844

अंगारकी संकष्टी निमित्त सांगलीहून गणपतीपुळ्यात आलेले दोघेजण बुडालेल्याची घटना ताजी असताना आज दुसऱ्या दिवशी सांगलीचे तिघेजण बुडाले. दोघांनी पोहत किनारा गाठला मात्र एकजण बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरु होता. सायंकाळी त्याचा मृतदेह भंडारपुळे समुद्रकिनारी सापडला.

तिघेही मंगळवारी गणपतीपुळ्यात दर्शनासाठी आले होते. गणपतीपुळ्यातील लॉजवर ते राहिले आणि सकाळी गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी ते गेले असता पाण्याचा अंदाज आला नाही. सदाशिव उफळकर आणि त्याचा दुसरा सहकारी यांनी पोहत किनारा गाठला. मात्र सुनील हरीमणी (31) हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात खेचला गेला. त्याचा बुडून मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या