लहानपणी दारू प्यायल्याची मोठा झाल्यावर शिक्षा, चाबकाने फोडून काढला

33
Young man flogged 80 times for drinking alcohol as a child

सामना ऑनलाईन, काशमार

इराणमध्ये एका तरुणाला सार्वजनिकरित्या झाडाला बांधून ठेवत चाबकाच्या फटक्यांनी फोडून काढण्याची शिक्षा दिली. या तरुणाने १४ किंवा १५ वर्षांचा असताना दारू प्यायली होती, त्याबद्दल त्याला आत्ता शिक्षा देण्यात आली आहे. त्याला चाबकाचे फटके मारत असतानाचा फोटो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केला आहे.

एमआर असं या तरुणाचं नाव सांगण्यात येत आहे. या तरुणाला जवळपास ११ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती, मग या तरुणाला आत्ता शिक्षा का देण्यात आली आहे हे कळू शकलेलं नाही. ही घटना आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचं म्हणत अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या घटनेचा निषेध केला आहे. या संघटनेचे मध्य पूर्वचे अध्यक्ष फिलीप्स ल्युथर यांनी म्हटलंय की चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देणं हे अत्यंत अघोरी आहे. लहान असताना दारु प्यायली म्हणून ११ वर्षांनी त्याला शिक्षा देणं ही बाब अत्यंत चिंतादायक आहे असंही ल्युथर यांचं म्हणणं आहे. ज्याला शिक्षा देण्यात आली त्याने एका लग्नात दारू प्यायली होती. याच लग्नात एक भांडण झालं होतं ज्यामुळे १७ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूशी दारू पिणाऱ्या मुलाचा काहीही संबंध नव्हता, तरीही त्याला अटक करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या