अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ११ वर्षाचा कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
girl-rape

सामना प्रतिनिधी। परभणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राम प्रल्हाद घोडके (२७) याला जिल्हा सत्र न्यायालयाने ११ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.१२ जुलै २०१६ रोजी पहाटे साखला प्लॉट मधील ज्ञानेश्वर नगर येथे अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या राहत्या घरी एकटी असल्याचे बघून घोडके (२७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या आदेशाने आरोपीला तपासीक अंमलदार तथा फौजदार बालासाहेब डोंगरे यांनी तातडीने गजाआड केले होते. तसेच त्या प्रकरणाच्या चौकशी अंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावेही जोडले होते.

त्यानुसार परभणी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी राम घोडके याच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी आरोपीस ११ वर्षाचा कारावास सुनावला. तसेच ११ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या शिक्षेमुळे अल्पवयीन मुला-मुलींच्या संदर्भात गैरकृत्य करणाऱ्यास चांगलीच चपराक बसली आहे.