पत्नीला जाळून मारणार्‍ या पतीला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

स्वतःच्या पत्नीला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. धर्मचंद्र भिकाजी भुरवणे, वय 48, रा., तेरे, संगमेश्वर असे आरोपीचे नाव आहे़.

ही घटना 29 मार्च 2017 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. आरोपीची पत्नी धनश्री रात्री जेवण करत असताना पती दारु पिऊन घरात आला. पत्नीवर संयश घेऊन शिविगाळ व मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये ती 70 ते 75टक्के भाजली. शेजार्‍ यांनी या घटनेची तिने माहिती दिली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी रुग्णालयातच तिचा जबाब घेण्यात आला होता. त्यानंतर उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ गंभीर जखमी धनश्रीला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे.हॉस्पीटल व नंतर कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही तिची जबानी घेण्यात आली होती. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

संगमेश्वर पोलिसांनी भादवी कलम 323 व 302 अन्वये गुन्हा दाखल केला. आज या खटल्याचा निकाल झाला. सरकारी पक्षाच्यावतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.पुप्षराज शो ट्ये यांनी काम पाहिले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एन.जोशी यांनी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व 1हजार रुपये दंड ठोठावला़ दंड न भरल्यास दोन महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली.