जेव्हा सीलने नाविकाला ऑक्टोपस फेकून मारला… पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. समुद्रात काही तरुण नौका विहार करतानाचा हा व्हिडीओ आहे. यात सील मासा तोंडात ऑक्टोपसला धरुन आणतो आणि एका नाविकाच्या तोंडावर फेकून मारतो. असं दृश्य दिसत आहे.

या नाविकाचं नाव टायो असून त्याच्या कायल नावाच्या मित्राने ही मजेशीर घटना मोबाईल मध्ये कैद केली आहे. कायलनेच हा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट केला असून लाखो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केलं आहे. या व्हिडीओत निळाशार समुद्र दिसत आहे. त्यात अनेकजण बोट चालवत आहेत. टायोदेखील बोट चालवत असून कायल मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. सगळेजण थट्टा मस्करी करत असतानाच अचानक पाण्यातून एक सील मासा तोंडात ऑक्टोपसला धरुन आणतो व काही कळायच्या आतच त्याला टायोच्या तोंडावर फेकून मारतो व पुन्हा पाण्यात जातो. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे टायो व कायल गडबडतात. पण नंतर पोट धरून हसताना व्हिडीओत दिसत आहे.