
सामना ऑनलाईन । मुंबई
सोशल मीडियाच्या जमान्यात जग वेगाने जवळ येत चाललं आहे. त्यामुळे अनेकांना फायदाही झाला आहे. पण, सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. सोशल मीडियावर असणाऱ्या कित्येकांना त्याची झळ बसते. असाच काहीसा प्रकार मुकेश मखिजा यांच्यासोबत घडला असून वेबसाईटच्या माध्यमातून आयफोन विकण्यासाठी गेलेल्या मखिजा यांना अश्लील शिवीगाळ झाली आहे.
ओएलएक्स या वस्तू खरेदी-विक्रीसाठी असलेल्या वेबसाईटवर हा प्रकार घडला आहे. आपला आयफोन विकण्यासाठी मुकेश मखिजा यांनी ओएलएक्सची मदत घेतली होती. वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. मखिजा यांनी या प्रकाराबद्दल ट्वीट करून मुंबई पोलिसांना याची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याविषयी सांगितलं आहे.
Complaint for using Abusing language on @OLX_India @OLX Dear @MumbaiPolice @CPMumbaiPolice pls find the snap of chat how person is using such words on #OLX + find the below url of user Ad for easy to track. https://t.co/6ScLQMu0NF pic.twitter.com/0f73na7MrA
— Mukesh Makhija (@MukeshMakhija3) August 18, 2018





























































