महाराष्ट्रातील नरभक्षक वाघाची भोपाळला रवानगी! वन विहारच्या तुरुंगात काही दिवस मुक्काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवी वस्तीत घुसखोरी करून वर्षभरात तिघांची हत्या करणार्‍या नरसंहारक वाघाची भोपाळला रवानगी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. कान्हा अभयारण्यात मुक्त संचार करणार्‍या या वाघाला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले असून भोपाळच्या वन विहार येथे या वाघाला काही दिवस पिंजर्‍यात ठेवण्यात येणार आहे.

5 वर्षाच्या या वाघाने चंद्रपूर येथून मध्य प्रदेश येथील पळसपाणी हा 510 किमी चा टप्पा ओलांडला. संचार करत असताना वाटेत त्याने अनेकदा मानवी वस्तीवर हल्लादेखील केला. एवढेच काय तर 2019 ते आतापर्यंत तिघा जनांचा जीव घेतला. अखेर हा नरभक्षक वाघ धोकादायक असल्याचे लक्षात येताच वन विभागाने त्याला पकडण्याची मोहीम हाती घेतली. 10 डिसेंबर 2018 रोजी अधिकार्‍यांनी या वाघाला सारणी येथून पकडले आणि कान्हा नेशनल पार्क मध्ये सोडले. कान्हा नेशनल पार्क येथून भोपाळच्या वन विहार येथे या वाघाची रवानगी करण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी नॅशनल पार्कमध्ये सापळा रचला. शनिवारी सायंकाळी  5 च्या सुमारास या वाघाला पकडण्यात आले. व 440 किमी लांब असलेल्या भोपाळच्या वन विहार येथे हलविण्यात आले.

  • नर जातीच्या या वाघाने अमरावती जिल्ह्यातील 19 ऑक्टोबर रोजी मंगरूल दस्तगिर येथील इसमाचा तर अंजानिंसगी येथील माणसावर 22 ऑक्टोबर रोजी हल्ला केला होता या हल्ल्यात दोघांचा बळी गेला.
  • अनेक जनावरांवर तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना.
  • भोपाळ पासून 200 किमी अंतरावरील सातपूरा व्याघ्र प्रकल्पाजवळ एकाच बळी घेतला.
  • सुमारे सहा तासात हिंस्र वाघाला पकडण्यात यश.