
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
फॅशनेबल कपडे घालतो…टापटीप राहतो…यावरून सतत खडे बोल सुनावणाऱया मोठय़ा भावाचा लहान भावाने वाटा काढल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सात तासांत जंगलात लपलेल्या लहान भावाला बेडय़ा ठोकल्या असून विरेन हरिजन असे या आरोपीचे नाव आहे. त्याने गणेश हरिजन या मोठय़ा भावाच्या छातीत व गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार करून हत्या केली. गणेश हा बिगारी तर विरेन हा कल्याणच्या खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. विरेन हा चांगले कपडे घालून टापटीप राहत असल्याची बाब गणेशला खटकत होती. दोन दिवसांपूर्वी यावरूनच गणेशने विरेनसोबत भांडण केले होते. त्याचा राग मनात धरून विरेनने गाढ झोपेत असलेल्या गणेशच्या छातीत व गळ्यावर स्क्रू ड्रायव्हर खुपसून त्याला ठार केले. त्यानंतर तो फरार झाला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जंगलातील झाडाझुडपात लपलेल्या विरेनला ताब्यात घेतले.




























































