मित्रावर चाकूने 107 वार केले, प्रायव्हेट पार्ट कापला अन् डोळेही काढले, नंतर चित्रपटगृहात जाऊन…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

एका शेफने आपल्या मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मित्रावर 40 मिनिटांमध्ये चाकून 107 वार केले, एवढेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. यावरही समाधान न झालेल्या आरोपीने त्याचे डोळेही फोडले. अत्यंत निर्घृणपणे खून केल्यानंतर आरोपी चित्रपटगृहामध्ये गेला आणि त्याने तिथे ‘द कॉन्ज्यूरिंग 3: द डेविल मेड मी डू इट’ हा चित्रपटही पाहिला. ही घटना इंग्लंडमध्ये घडली आहे.

20 वर्षीय आरोपी ल्यूईस एशडाऊन याने आपल्या 18 वर्षीय मार्क विलियम्स नावाच्या मित्राला दारु पिण्यासाठी बोलावले आणि त्याला घेऊन जंगलामध्ये गेला. येथे मार्कला व्हिस्की पिऊन आणि कोक खावून तर्राट झाला तेव्हा एशडाऊन याने चाकू काढला आणि त्याच्यावर वार केले. जवळपास 40 मिनिटे तो मार्कवर वार करत होता. यानंतर त्याने त्याचे कपडे काढले आणि प्रायव्हेट पार्ट कापला, तसेच त्याचे डोळेही काढून घेतले. या हत्याकांडाचे व्हिडीओही एशडाऊन याने काढले.

एशडाऊन याने काढलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये तो मार्कच्या डोक्यावर फुटबॉलप्रमाणे लाथा घालताना दिसत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ल्युईस क्राउन कोर्टात न्यायाधीशांपुढे उभे केले. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, आरोपी एशडाऊन आणि मार्क याची 6 महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर मैत्री झाली होती. 29 मे रोजी दोघांनी एकमेकांना मेसेज केला आणि भेटायचा प्लॅन ठरला. एशडाऊन याने बिअर, व्हिस्की आणि कोकची खरेदी केली. नशेमध्ये तर्राट झाल्यानंतर एशडाऊन याने मार्कचा चेहरा, डोळे, मान, डोके, पाठ, प्रायव्हेट पार्ट, छाती आणि पायावर 107 वेळा चाकून वार केले आणि त्याची हत्या केली. मार्क आपल्याला त्रास देत होता म्हणून त्याची हत्या केल्याची कबुली एशडाऊन याने दिली आहे.