मोकाट जनावराच्या धडकेत इसमाचा मृत्यू, नगरपालिकेच्या आवारात ठेवला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदापूर

इंदापूरमध्ये मोकाट जनावरांने धडक दिल्याने जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृतू झाला आहे. अशोक साळुंके असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोकाट जनावराने धडक दिल्याने साळुंके गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामळे संतप्त नातेवाईकांनी नगरपालिका प्रशासनाविरूध्द आक्रमक होत साळुंके यांचा मृतदेह नगरपालिकेसमोर ठेवला आहे.

इंदापूरमध्ये मोकाट जनावरांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेकडून मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवणे गरजेचे असताना कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशोक साळुंके यांचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे नातेवाईक आणि नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला आहे.