
चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फडशा पाडला. यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला. ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे. नयनतारा ही छोटा मटकाची प्रेयसी वाघीण आहे. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय. या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रम्हा याचाही समावेश आहे. प्रेयसीसाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांना संपवल्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना आहे. ‘छोटा मटका’ने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचीही गय केलेली नाही. यापूर्वी त्याने ‘मोगली’ या वाघाला असेच ठार केले होते. 14 नोव्हेंबर 2023 रोजी ’बजरंग’ वाघाला ठार करून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता ‘ब्रह्मा’ला ठार करून आपणच अनभिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले.