बेपत्ता गायीविषयी विचारणा केली म्हणून तलवारीने कापला हात

सामना ऑनलाईन । भोपाळ

आपल्या बेपत्ता झालेल्या गायीची चौकशी एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. गायीच्या विचारणेपायी त्याने स्वतःचा हात गमावला आहे. प्रेम नारायण उर्फ कल्लू असं या माणसाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जयपूर-जबलपूर महामार्गा नजीक ही घटना घडली. कल्लू येथील पीपलवाली गावात राहतो. काही काळापूर्वीच त्याची गाय हरवली होती. त्याच्या गावातच राहणाऱ्या एका सत्तू यादव याच्याकडे त्याच्या गायीसंबंधी कल्लूने विचारणा केली. त्याने काहीही उत्तर न दिल्याने कल्लूने त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सत्तू, त्याचा मुलगा राजपाल, राहुल यादव, पत्नी शकुनबाई आणि सत्तू लोधी यांनी मिळून कल्लूला पकडून एका झाडाला बांधून टाकलं. तिथे त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर कल्लूचा एक हातही तलवारीने कापण्यात आला. कल्लूच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच ते धावत घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलीसही तिथे दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

summary- man lost his hand in lynching