कमालच! टाटा नॅनोला बनवली सोलर कार

पेट्रोल आणि डिजेलच्या सततच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने केलेल्या अनोख्या जुगाडाची जोरदार चर्चा आहे. बाकुंडा जिह्यातील मनोजित मंडल यांनी आपल्या नॅनो कारचे रूपांतर सौर ऊर्जेवर धावणाऱया कारमध्ये केले आहे. ही कार 30 ते 35 रुपयांत 100 किमी अंतर कापते. मनोजित यांनी आपल्या कारवर ‘नो पेट्रोल, सोलर कार… द कार ऑफ फ्युचर’ असे लिहिले असून ही कार रस्त्यावरून धावताना सर्वांचे लक्ष वेधून घेते.