बसमध्ये प्रवेश न दिल्याने तरूणाने काचा फोडल्या, मालाडच्या मीठचौकीतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बसमध्ये प्रवेश न दिल्याने चिडलेल्या एका तरूणाने बसवर दगड मारून तिची समोरची काच फोडल्याची घटना मालाड येथील मीठचौकी सिग्नल परिसरात घडली आहे. बांगर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

बेस्ट मार्ग क्र. 345 ही चारकोप ते संतोष नगर विस्तारीत बसमार्ग धावणारी बस मालाड पश्चिमेकडील मीठचौकी सिग्नलवर सकाळी उभी असताना एका तरूणाने बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यास अटकाव केल्याने त्याने ड्रायव्हरशी वाद घालत बसवर दगड मारीत काच फोडली. बांगूरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या तरूणाला अटक केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.