
सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया
सर्वाधिक २३ ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिच्या मोठ्या बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. सेरेनाची मोठी बहीण येतुंडे प्राईस हिची २००३ मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी रॉबर्ट एडवर्ड मॅक्सफिल्ड याला अटक केली होती.

सेरेना आणि व्हिनस विलियम्सची मोठी बहीण येतुंडे प्राईसची ४ सप्टेंबर २००३ रोजी हत्या करण्यात आली होती. व्यवसायाने नर्स असलेल्या प्राईसची भर रस्त्यात रॉबर्ट एडवर्ड मॅक्सफिल्ड या माथेफिरूने गोळ्या घालून केली होती. या प्रकरणी रॉबर्टला २००६ साली वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. रॉबर्ट गेल्या पंधरा वर्षांपासून तुरुंगात असून त्याची गेल्या शुक्रवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पोलिसांनी रॉबर्टला पुन्हा अटक केली आहे.
याप्रकरणात सेरेना आणि व्हिनसने तीन वर्षे न्यायालयीन लढा देत त्यांच्या बहिणीच्या मारेकऱ्याला शिक्षेपर्यंत पोहचवलं होतं. येतुंडेच्या हत्येनंतर सेरेना आणि व्हिनस दोघींनाही प्रचंड धक्का बसला होता. काही काळ त्यांनी स्वत:ला टेनिस कोर्टपासूनही दूर ठेवलं होतं.
summary : man rearrested for killing serena william sister yetunde price

























































