
सामना प्रतिनिधी । मुंबई
सोमवारी रात्री मुलुंडच्या गौतम नगरातील पंचरत्न सोसायटीत सुरेश साळवे (50) याची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. सुरेश साळवे हा साळवे चाळीतील खोली क्रमांक 136 मध्ये राहत होता. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी साळवेवर धारदार शस्त्राने साळवेच्या चेहरा व जबडय़ावर गंभीर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या साळवेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते.






























































