दारुच्या नशेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । बोरी

जिंतूर तालुक्यातील चांदज येथील एका इसमाने राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदज येथील रहिवाशी असलेले आत्माराम बाबाराव बनसोडे (26) यांनी 11 मे च्या मध्यरात्री दारू पिऊन अज्ञात कारणाने रबरी पाईपच्या सहाय्याने राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात त्याचे बंधू आसाराम बनसोडे यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ-भावजय असा परिवार आहे. अधिक तपास जमादार विष्णू गिरी हे करत आहेत.