
दापोलीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कादिवली येथे नदीला पूर आला आहे. नदीवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प पडली आहे. त्यामुळे अनेकजन पुलाच्या अलिकडेच रस्त्यावर अडकून पडल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले.
भारतीय हवामान विभागाने कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीचा वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोकणातील नदी, नाले, परे पुराच्या पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सगळीकडेच पाणीच पाणी झाले आहे. याचा फटका साधारणपणे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला बसला आहे. असाच काहीसा प्रकार हा दापोली तालुक्यातील कादीवली येथील नदीवरून पाणी वाहू लागल्याने दापोलीकडून कादिवली मार्गे वेळवी पंचक्रोशितील गावाकडे जाणाऱ्या आणि वेळवीकडून कुडावले गावाकडे येणाऱ्या गावातील लोकांना झाला होता. कादीवली नदीवरील पुलावरून दिवसभर पुराचे पाणी वाहत होते त्यामुळे या मार्गावरील वाहतुक पुर्णतः विस्कळीत झाली होती.




























































