काळ्या जादूसाठी मांडूळाची तस्करी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रामचंद्र सेनानी असं या आरोपीचे नाव आहे.

उल्हासनगरमधील व्हिनस चौकातील महालक्ष्मी हॉल जवळ रामचंद्र सेनानी हा मांडुळ साप विकण्यासाठी आणणार असल्याची पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती, त्यामुसार विठ्ठलवाडी पोलीस आणि हिललाइन पोलिसांच्या पथकाने  सापळा रचून रामचंद्र याला बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्याच्याकडील गोणी तपासली असता त्यामध्ये मांडूळ साप आढळला. या मांडूळ सापाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख रुपये असून त्यांचा काळ्या जादू साठी आणि औषध म्हणून वापर करणार असल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले. तसेच हा मांडूळ साप कोणाला विकण्यासाठी आणला होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वन्य जीव संरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी किती आरोपी आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.