
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक मंगला भास्कर यांनी पंधरा दिवसांपूर्वी मिंधे गटात प्रवेश केला होता. शुक्रवारी त्यांनी उपनेते सुनील बागुल यांच्या निवासस्थानी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. बागुल यांच्यासह सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यांचे स्वागत केले. मंगला भास्कर यांच्याबरोबर मिंधे गटात गेलेल्या सुनीता शिंदे, उज्ज्वला बोराडे, सुवर्णा घोडे यांनी शनिवारी वणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा प्रवेश केला.



























































