
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर आज रात्री 8 वाजता सिंधुदुर्ग ते कणकवली स्थानकांदरम्यान मंगला एक्प्रेसचे इंजिन बिघडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. यामुळे चाकरमानी मात्र लटकले. दरम्यान 9.30 वाजता कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
कोकण रेल्वे मार्गावर 12618 हजरत निजामुद्दीन-लक्षद्वीप मंगला एक्प्रेसचे इंजिन सिंधुदुर्ग ते कणकवली स्थानकांदरम्यान बिघडले. यामुळे गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात आलेल्या गणपती विशेष गाडय़ा, कोकणकन्या एक्प्रेस तसेच मुंबईवरून जाणाऱ्या गाडय़ा थांबविण्यात आल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, दुसरे इंजिन मागविण्यात आल्यानंतर रात्री 9.30 वाजता मार्ग सुरळीत झाला.
summary- mangala express delayed































































