मंगळाच्या कक्षेत मंगलयानची सात वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या मार्स ऑर्बिटर स्पेसक्राफ्टने म्हणजेच मंगलयानाने त्याच्या कक्षेत सात वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आणखी वर्षभर तरी हे यान मंगळाच्या कक्षेत राहून काम करेल.

मंगळ मोहीम ही ‘इस्रो’ची पहिली आंतरग्रहीय मोहीम आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी या मोहिमेचा शुभारंभ झाला होता. मंगलयानाने पहिल्याच प्रयत्नात 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला होता. तेव्हापासून  ‘इस्रो’ लक्ष ठेवून आहे. मंगळयानाच्या यशस्वी वाटचालीबद्दल शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.  यानाचे हालचाल घटणारे घटक काही समस्यांचा सामना करत आहेत. काही अनावश्यक गोष्टी आम्हाला बदलाव्या लागतील, असे मंगळ मोहिमेचे कार्यक्रम अधिकारी एम. अण्णादुराई यांनी सांगितले.