सुनील तटकरेंना धक्का, माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

28

सामना ऑनलाईन । माणगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या योगिता चव्हाण या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या बंडखोर शुभांगी जाधव यांची वर्णी लागली आहे.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणारे एकूण १७ सदस्य होते. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ५ तर काँग्रेसचे १ नगरसेवक होते. यापैकी राष्ट्रवादीच्या काही नाराज नगरसेवकांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. गेले अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. त्यांच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत शिवसेनेने यशस्वी रणनिती आखली होती.

आपली प्रतिक्रिया द्या