माणिकराव गावीत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पेंद्रीय मंत्री माणिकराव गावीत (87) यांचे आज  नाशिकमधील रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. माणिकराव गावीत हे 1981 पासून 2009 पर्यंत सलग नऊवेळा नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब नावाने ते लोकप्रिय होते. 1965मध्ये त्यांनी ग्रामपंचायतीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, नंतर धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. 1980 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पेंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.