#INDvAUS मनीष पांडेने घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडीओ

टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामध्ये राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात मनीष पांडेने ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल घेतला आहे. त्याच्या या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. बीसीसीआयने देखील त्याच्या या कॅचची तारिफ केली आहे.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 341 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर सलामीसाठी उतरले. हे दोन्ही स्फोटक फलंदाज टीम इंडियाच्या विजयामधले मोठे अडथळे होते. त्यामुळे यांना लवकर बाद करणे गरजेचे होते. त्यामुळे वॉर्नरने तिसऱ्या षटकात दिलेली संधी मनीष पांडेने बिलकूल वाया जाऊ दिली नाही. त्याने उंच उडी घेत एका हाताने वॉर्नरचा झेल घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या