मनीषा कीरचे विक्रमासह रौप्य पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची युवा नेमबाज मनीषा कीर हिने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधून ‘आयएसएसएफ’ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विक्रमासह रौप्य पदकाला गवसणी घातली. मध्य प्रदेश, भोपाळ येथील कन्येने ज्युनियर महिलांच्या ट्रप प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली.

इटलीच्या इरिका सेसा हिने गोल्ड मेडल जिंकले, तर रशियाच्या दारिया सेमियानोवा हिने कास्य पदकावर मोहोर उमटवली. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी मनीषा कीरने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. दक्षिण कोरियात ही स्पर्धा सुरूआहे.

अंजुम, अपूर्वीने केले ऑलिम्पिकचे तिकीट बुक

अंजुम मौडगिल व अपूर्वी चंडेला यांनी 2020 सालामध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. ‘आयएसएसएफ’ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 10 मीटर एअर रायफल या प्रकारात अंजुम मौडगिल हिने रौप्य पदक जिंकले आणि अपूर्वी चंडेला हिने चौथा क्रमांक पटकावला. त्यामुळे दोघींनाही ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री मिळाली.