
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संजू चित्रपटात नर्गिस यांची भूमिका केल्यानंतर अभिनेत्री मनीषा कोईराला लवकरच एका हेरगिरीवर आधारित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. एप्लॉस एन्टरटेंटमेंटचे संस्थापक समीर नायर ‘क्राईम थ्रिलर आयविटनेस’ (२०१६) ही अमेरिकन वेबसीरिज हिंदीत आणणार आहेत. यात मनीषा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
समीर यांनी मनीषाला वेब सीरिजमधील मुख्य भूमिकेसाठी विचारलं होत. मनीषाला ही कथानकही आवडलं आणि त्यातील तिची भूमिकाही. त्यानंतर या प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी समीरबरोबर तिची अनेकवेळा मिटींगही झाली. पण त्यातून फारसं काही निष्प्पण होत नव्हतं. पण आता मनीषाच ही भूमिका करणार असल्याचं ठरलय. या सीरिजच दिग्दर्शन चंदन अरोरा करणार आहे. चंदन यांनी कृष ३, आणि पॅडमॅन यासारख्या चित्रपटात एड़िटरच काम केलं आहे. सध्या शुटींगसाठी मनीषाच्या डेट्स घेण्यात ते बिझी आहेत.
आयविटनेस ही कथा दोन मुलांची आहे. हे दोघ चांगले मित्र असून एका गुन्हयाचे ते साक्षीदार आहेत.























































