
गतिमंद मुलीला खाऊचे आमिष दाखवत घरी नेऊन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी मुन्नालाल पटवा (38) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरात शनिवारी दुपारी 1 ते 4 च्या सुमारास बलात्काराची घटना घडली. आरोपी मुन्नालाल हा मंगळसूत्र बनविणारा कारागीर आहे. तो राहतो त्याच परिसरात राहणारी 11 वर्षांची दिव्यांग व गतिमंद मुलगी एकटीच असल्याचे हेरून मुन्नालालने संधी साधली. त्याने खाऊचे आमिष दाखवून मुलीला घरी नेले व तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुन्नालालविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मानखुर्द पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून स.पो.नि. संतोष शेलार व किरण आंबेकर यांच्या पथकाने आरोपी मुन्नालाल याला पकडले.

























































