माणसाला घेऊन उडणारे ड्रोन लवकरच नौदलात सामील होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणसाला घेऊन उडणारे देशी बनावटीचे ड्रोन लवकरच हिंदुस्थानच्या नौदलात सामील होणार आहे. ‘वरुण’ असे या ड्रोनचे नामकरण करण्यात आले आहे. तब्बत 100 किलो वजन घेऊन 25-30 किलोमीटरपर्यंत अर्धा तास हे ड्रोन उड्डाण करू शकणार आहे. पुणे येथील स्टार्टअप सागर डिफेन्स इंजिनीयरिंगने हे ड्रोन विकसित केले असल्याचे नौदलाने म्हटले आहे. दरम्यान, ड्रोनमध्ये काही बिघाड झाल्यास पॅराशूटच्या माध्यमातून सुरक्षित लँडिंग करणे शक्य असल्याचे कंपनीचे संस्थापक निकुंज पाराशर यांनी स्पष्ट केले आहे. या ड्रोनची जुलैमध्ये चाचणी करण्यात आली आहे.