
जून महिन्याच्या आत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करा; अन्यथा जूनपासून पुन्हा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
जरांगे-पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुंबई येथील आंदोलन संपल्यावर तत्काळ हैदराबाद गॅझेटीयर लागू करू आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र अद्यापही कार्यपद्धती राज्य सरकारने ठरवली नाही, असे जरांगे म्हणाले.



























































