‘एक मुकदमा कर दो… जवाहरलाल नेहरू हाजिर हों! आरजेडी खासदार मनोज झा यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये भाग घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत केलेल्या दाव्यांचे खंडन करावे अशी मागणीही केली. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत सरकारला कोंडीत पकडले.

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. याचाच उल्लेख करत मनोज झा यांनी मोदी सरकारला जवाहरलाल नेहरू यांच्या एक खटलाच दाखल करा असे म्हणत उपरोधिक टीका केली. तसेच नेहरू इतक्या वर्षानंतरही तुम्हाला आठवत असतील तर त्यांच्यात काहीतरी नक्कीच खास असणार, असेही ते म्हणाले.