मराठा आंदोलन; बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

781

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही तरुणांनी बलिदान दिले. या तरुणांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत व कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिलीे.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. आंदोलनादरम्यानच अनेक मराठा तरूणांनी प्राणांचेही बलिदान दिले. काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. या तरुणांच्या बलिदानाला न्याय देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई तसेच कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या